राजीनामा होत नाही, तोपर्यंत मैदान सोडू नका : दिपके
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): सततच्या पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो तरुणांचे भविष्य अंधारात सापडल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात रविवारी (दि.२०) आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनस्थळी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत एमपीएससीच्या अधिकाऱ्यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेऊ नका, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सरकारला केवळ आपल्या हक्कासाठी
पाहिजे. रस्त्यावर उतरून ही ताकद दाखवून दिली
दिल्लीतील आंदोलनात लाठीचार्ज, डोकी फुटणे आणि गंभीर आणि दुखापती होऊनही आंदोलक मागे हटले नाहीत. त्यामुळे सरकारला झुकावे लागले होते, असेही दिपके म्हणाले. विदर्भ आणि मराठवाडा अशा विविध भागात विखुरण्यापेक्षा सर्व विद्यार्थ्यांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले. हा लढा शेवटपर्यंत टिकून राहण्याची तयारी ठेवा, मी स्वत तुमच्यासंबत बसून राहीन असा विश्वासही त्यानी यावेळी व्यक्त केला.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions















